Join us

तारक मेहता का उल्टा चश्मा: दयाबेन In तर, टप्पू Out? राज अनादकटने सोडली मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:10 IST

Taarak mehta ka ooltah chashmah: अभिनेता शैलश लोढा यांच्यानंतर या मालिकेतील आणखी एका कलाकाराने मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

 गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (taarak mehta ka ooltah chashmah)  ही मालिका चर्चेत येत आहे. जवळपास १४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतून अनेक कलाकारांनी काढता पाय घेतला आहे. तर, काही कलाकारांची नव्याने एन्ट्री होत आहे. यामध्येच तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलश लोढा यांच्यानंतर या मालिकेतील आणखी एका कलाकाराने मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेत लवकरच दयाबेनची एन्ट्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तारक मेहताच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर दयाबेनच्या एन्ट्रीचा एक प्रोमोदेखील शेअर करण्यात आला आहे. परंतु, दयाची एन्ट्री होताच तिचा लाडका लेक टप्पू या मालिकेला रामराम करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे त्याने ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, याविषयी अद्याप राजकडून वा मालिकेच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, आतापर्यंत अनेक कलाकारांनी या मालिकेला रामराम केला आहे. सोढीची भूमिका साकारणारे गुरचरण सिंह, अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता, बावरीच्या भूमिकेतील मोनिका भदौरिया, टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी आणि दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी या कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. परंतु, आता भव्य गांधीनंतर राजदेखील ही मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनटिव्ही कलाकार