Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोक लावा अन् पोस्टरमध्ये शोधा 'मिर्झापूर ३' ची रिलीज डेट, प्राईमने शेअर केलेला नवीन पोस्टर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 09:23 IST

'मिर्झापूर ३' ही वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याची रिलीज डेट समोर आली आहे, पण त्यात थोडा ट्विस्ट आहे.

Mirzapur Season 3 Release Date : 'मिर्झापूर ३' ची उत्सुकता शिगेला आहे. भारतातील बहुप्रतिक्षित वेबसिरीजमध्ये  'मिर्झापूर ३' टॉपला असेल यात शंका नाही.  गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक 'मिर्झापूर 3' ची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर (Mirzapur) आणि मिर्झापूर 2 हे दोन्ही पार्ट ओटीटीवर प्रचंड गाजले होते. त्यामुळे या सीरिजचा तिसरा पार्ट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यामध्येच आता या सीरिजविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

 'मिर्झापूर ३' च्या रिलीज डेटची चर्चा असतानाच प्राईम व्हिडीओने एक नवीन पोस्टर शेअर केलाय. प्राइम व्हिडीओने इंस्टाग्रामवर 'मिर्झापूर ३' ची रिलीज डेट जाहीर केली आहे, परंतु त्यात एक ट्विस्ट आहे. ही सिरीज कोणत्या दिवशी येणार हे तुम्हाला शोधायचं आहे. 'मिर्झापूर ३' रिलीज डेट ही या पोस्टरमध्ये लपलेली आहे. ती तारीख तुम्हाला शोधावी लागणार आहे. 

प्राइम व्हिडीओने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये 'मिर्झापूर' वेब सिरीजमधील पात्रे ॲनिमेशन ग्राफिक्समध्ये दिसत आहेत. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. नेटकऱ्यांनी 'मिर्झापूर' सीरिजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज डेट शोधण्याचा प्रयत्न केला आहे. एका युजरने या पोस्टरमध्ये ७ चे कनेक्शन शोधले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, पोस्टरमध्ये ७ बंदुका आहेत, ७ लोक आहेत, कारवर ७ लिहिले आहे आणि कार्पेटवर देखील ७ आहेत. अशा परिस्थितीत शोची रिलीज डेट ७ जुलै असू शकते. 

'मिर्झापूर ३' मध्ये पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा अखंडानंद त्रिपाठी उर्फ ​​कालिन भैयाच्या भूमिकेत दिसणार आहे. अली फजल पुन्हा गुड्डू पंडितच्या भूमिकेत परतणार आहे, जो पुन्हा बदला घेण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे दिव्येंदू देखील फुलचंद उर्फ ​​मुन्ना त्रिपाठीच्या भूमिकेत 'मिर्झापूर ३' मध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. तर रसिका दुग्गल बीना त्रिपाठी आणि श्वेता त्रिपाठी शर्मा गजगामिनी उर्फ ​​गोलू गुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये  प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजपंकज त्रिपाठीअली फजलसेलिब्रिटीबॉलिवूड