Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये, कधी आणि कुठे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:44 IST

'झापुक झुपूक' सिनेमा आता ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. निर्मात्यांनी सूरजच्या प्रेक्षकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे.

सर्वाधिक चर्चेत असलेला  'झापुक झुपूक' हा कौटुंबिक मनोरंजन देणारा मराठी चित्रपट २५ एप्रिलपासून थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणने सिनेमातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. सूरजच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, रीलस्टारचा  'झापुक झुपूक' सिनेमा आता ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. निर्मात्यांनी सूरजच्या प्रेक्षकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक मोठ्या संख्येने या सुवर्ण संधीचा लाभ घेतील. 

केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'झापुक झुपूक' हा चित्रपट येत्या मंगळवारी म्हणजेच २९एप्रिल रोजी प्रेक्षकांना अवघ्या ₹९९ मध्ये थिएटरमध्ये पाहता येणार आहे. तर मग, हसा, धमाल करा आणि तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन 'झापुक झुपूक' चित्रपचाटचा फक्त ₹९९ रुपयांमध्ये आनंद घ्या. 

 सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे यांच्या सारख्या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयामुळे 'झापुक झुपूक' सर्वत्र लोकप्रिय ठरत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सूरजला अभिनय कौशल्यासाठी त्याच्या चाहत्यांकडून प्रशंसा मिळत आहे.  चित्रपटातील एका पेक्षा एक सरस गाणी म्युझिक चार्टबस्टरवर टॉपला वाजत आहेत. सध्या प्रत्येक क्लब, पब आणि पार्ट्यांमध्ये झापूक झुपूक शीर्षक गीत तर लग्न समारंभात वाजीव दादा हे हळदीच गाणं धुमाकुळ घालत आहे. तर प्रेमीयुगलांमध्ये प्रितीची घंटा वाजतेय. 

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत,  जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे , केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' या चित्रपटातील संवाद, कथा आणि विनोदी प्रसंगांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत आहे. सोशल मीडियावरही 'झापुक झुपूक' ट्रेंडमध्ये असून प्रेक्षकांनी या सिनेमाचे कौतुक करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :केदार शिंदेटिव्ही कलाकारसिनेमा