Join us
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरने रडवले होते, आता बंगाल घाबरवेल! विवेक अग्निहोत्रींच्या ‘द बंगाल फाइल्स’चा टीझर पाहून अंगावर काटा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:05 IST

‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमांनंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘द बंगाल फाइल्स’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमांनंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सुरुवातीला या सिनेमाचं नाव 'द दिल्ली फाइल्स' असं ठेवण्यात आलं होतं. मात्र आता सिनेमाचं नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स’ असं करण्यात आलं आहे. ‘द बंगाल फाइल्स’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

टीझरमध्ये देशाच्या इतिहासातील एक भितीदायक बाजू पुन्हा एकदा समोर येतेय. टीझरमध्ये शिवा पंडित, अमर, गांधीजी, बॅनर्जी, भारती, माँ भारती अशा अनेकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. जर काश्मीर फाईलने तुम्हाला रडवलं असेल तर बंगाल तुम्हाला घाबरवेल असं टीझरमध्ये म्हटलं गेलं आहे. ‘द बंगाल फाइल्स’चा टीझर अंगावर काटा आणणारा आहे. टीझरमध्ये दाखवलेली दृश्य प्रेक्षकांना अस्वस्थ करणारी आहेत.

या सिनेनात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत.  ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेली असून, याची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी केली आहे. ‘फाइल्स ट्रिलॉजी’चा हा शेवटचा भाग असेल. ज्यामध्ये आधीचे ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ समाविष्ट आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीपल्लवी जोशीमिथुन चक्रवर्ती