Join us

Cannes 2023 : विजय वर्माला फॅशन डिझायनर्सने दिला होता नकार, १० वर्षांनंतर अभिनेत्याने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 17:43 IST

पहिल्यांदा मी या कार्पेटवर २०१३ मध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हा....

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' ला सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये यंदा बॉलिवूडमधून अभिनेत्री अनुष्का शर्मा, सारा अली खान, मृणाल ठाकूर यांनी डेब्यू केले आहे. तसंच दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील त्याच्या चित्रपटासाठी कान्समध्ये पोहोचला आहे. याशिवाय अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) सुद्धा कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचला आहे. पण ही काही त्याची पहिली वेळ नाही. त्याने त्याच्या करिअरमधील त्याच्या सुरुवातीच्या काळचा  एक किस्सा शेअर केला जो सध्या चर्चेत आहे.

एका मुलाखतीत विजय वर्मा म्हणाला, "पहिल्यांदा मी या कार्पेटवर २०१३ मध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हा एका फॅशन डिझायनरने मला ड्रेस देण्यास नकार दिला होता. मान्सून शूटआऊट या फिल्मसाठी तेव्हा मी कान्समध्ये आलो होतो. मी इव्हेंटसाठी आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की एक सूट घालावा लागेल. म्हणून मी काही प्रसिद्ध फॅशन डिझायनरकडे गेलो, पण आम्ही असं कोणासाठीही ड्रेस देत नाही अशी उत्तरं त्यांनी दिली होती."

तो पुढे म्हणाला, "मॉर्निंग फोटोकॉलसाठी मी जारा चा सूट परिधान केला होता. तेव्हा मी स्वत:ला मारवाडी जॉनी डेप समजत होतो. त्यानंतर मी रेड कार्पेटसाठी एक ब्लॅक टक्सिडो सूट शिवून घेतला. रॅम्पवरील फोटो जेव्हा गेटी इमेज साईटवर आले तेव्हा ते घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते."

माध्यम रिपोर्ट्सनुसार,  विजय वर्मा रुमर्ड गर्लफ्रेंड अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत रेड कार्पेटवर एंट्री घेऊ शकतो. त्याचा लुक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  

टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलफॅशनतमन्ना भाटिया