Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्याने चिखलात केली अंघोळ; फायदे सांगत शेअर केले व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 14:38 IST

पॉवरफुल अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवालने चक्क चिखलात अंघोळ केली आहे.

बॉलिवूडचा कमांडो अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल.विद्युत जामवाल त्याच्या चित्रपटांमध्ये सगळे धोकादायक स्टंट स्वत: शूट करत असतो. पॉवरफुल अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवालने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केलाय. विद्युत जामवालने चक्क चिखलात अंघोळ केली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. याशिवाय त्याने चिखलात अंघोळ करण्याचे फायदेही सांगितले आहेत. 

विद्युतने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं,  "ज्वालामुखीय चिखल हे ज्वालामुखीच्या राखेसह गरम पाण्याच्या झऱ्याचे मिश्रण करते. मातीचा ज्वालामुखी कित्येक शंभर मीटर ते काही किलोमीटरपेक्षा जास्त खोलीवर फुटतो. ज्वालामुखीच्या मातीतून उगम पावणारा गाळ मुख्यतः पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली गरम पाण्याच्या तापमानामुळे तयार होतो. या मातीत सल्फर, सिलिका, जस्त आणि मॅग्नेशियमसह खनिजे असतात".  

विद्युतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. काही दिवसांपुर्वीच विद्युतने बर्फामध्ये अंघोळ केलेली.  हिमालयाच्या शून्य अंश तापमानात त्याला बर्फात पडलेले पाहून चाहत्यांना धक्का बसला होता.

 

विद्युत जामवालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो आगामी काळात 'शेर सिंग राणा' आणि 'क्रॅक' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेता विद्युत जामवालने 'कमांडो', 'सनक', 'खुदा हाफिज' यांसारख्या चित्रपटातून लोकांची मने जिंकली आहेत. विद्युत जवळजवळ प्रत्येक चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसतो. विद्युत हा मार्शल आर्टिस्ट आहे आणि केरळच्या कलारीपट्टू मार्शल आर्ट्समध्ये तज्ञ आहे. विद्युतने आतापर्यंत २५ हून अधिक देशांमध्ये या कलेचे अनेक लाइव्ह अ‍ॅक्शन शो केले आहेत.

टॅग्स :विद्युत जामवालबॉलिवूडसेलिब्रिटी