Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी दर महिन्याला प्रेग्नेंट असायचे" विद्या बालनचं लग्न आणि आई होण्यावर मोठं वक्तव्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:53 IST

विद्या बालनने १४ डिसेंबर २०१२ मध्ये निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर याच्यासोबत लग्न केलं होतं.

Vidya Balan on Pregnancy: लग्न झालं की "बाळ कधी होणार?" हा प्रश्न आपल्या समाजात पती-पत्नीला वारंवार विचारला जातो. विशेषतः महिलांच्या बाबतीत हा दबाव अधिक जाणवतो. सर्वसामान्य स्त्रियांसोबतच अभिनेत्रीही या गोष्टीला अपवाद नाहीत. अशाच अनुभवांवर काही अभिनेत्री आपली मतं रोखठोकपणे मांडताना दिसल्या आहेत. अभिनेत्री विद्या बालन ही त्यापैकी एक. एका मुलाखतीमध्ये विद्या बालन हिनं स्पष्ट शब्दात समाजाच्या या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

विद्या बालनने १४ डिसेंबर २०१२ मध्ये निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला आता तब्बल १३ वर्षं पुर्ण झाली आहेत. पण, अद्याप विद्या ही आई झालेली नाही.  idiva दिलेल्या मुलाखतीत विद्यानं खुलासा केला होता की, लग्नानंतर दर महिन्याला तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरायच्या. विद्या म्हणाली, "लोक मला मोफत सल्ला द्यायचे. लग्नानंतर तुम्हाला बाळाला जन्म द्यायला हवा. एक वेळ अशी देखील होती जेव्हा मी दर महिन्याला प्रग्नेंट राहात होते. माझे फोटो क्लिक केले जायचे आणि मला विचारायचे बेबी बम्प आहे का? मी उत्तर द्यायची नाही माझं पोट आहे".

पुढे तिनं म्हटलं, "लोकांनी लग्न आणि मुलांबद्दल प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. जेव्हा तुमचं लग्न होतं, तेव्हा लोकं तुम्हाला कायम विचारतात तुम्ही मुलांना जन्म कधी देणार? तुमच्या वैवाहित आयुष्यात कोणतीही अडचण आली की त्याचं समाधान बाळ असले. लग्न, मुलं किंवा कुटुंब कोणत्या मुलीच्या आयुष्यातील समस्यांचं समाधान असू शकत नाही", असं स्पष्ट मत तिनं मांडलं. 

विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूल भुलैय्या ३'मध्ये दिसली होती. विद्याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. विद्या कायम विनोदी अंदाजातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सोशल मीडियावर विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

टॅग्स :विद्या बालनप्रेग्नंसीबॉलिवूड