Join us

Video : नोरा फतेहीची Oops मोमेंट झाली कॅमेऱ्यात कैद, विकी कौशलसोबत करत होती डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 19:15 IST

पछताओगे या गाण्यावरील डान्स दरम्यान नोरा उप्स मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली.

विकी कौशल आणि नोरा फतेहीचे 'पछताओगे' हे गाणं सध्या हिट ठरतंय. या गाण्याचे फक्त बोलच नाही तर त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना जास्त भावते आहे. या गाण्यानं 5 दिवसात 3 कोटी 88 लाख व्हुज मिळाले आहेत. हे गाणं अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्यामुळे सक्सेस पार्टी ठेवण्यात आली होती.त्यावेळी विक्की कौशल आणि नोरा फतेही ने पछताओगे या गाण्यावर डान्स केला. या डान्स दरम्यान नोरा उप्स मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की नोरा स्टेज वर विक्कीसोबत डान्स करताना दिसते आहे. यादरम्यान एक स्टेप करताना ती थोडी वाकल्यावर तिला अनकम्फर्टेबल वाटू लागलं आणि ती ड्रेस नीट करू लागली. हे सगळं व्हिडिओत कैद झालं. यावेळी नोरानं पिंक रंगाचा वनपीस परिधान केला होता तर विकी कौशलने काळ्या रंगाचा जॅकेट घातलं होतं

 'पछताओगे' या गाण्याला अर्जित सिंगने स्वरसाज दिला आहे आणि दिग्दर्शन अरविंद खैरानेनं केलं आहे. या संपूर्ण गाण्याचं शूटिंग शिमल्यात झालं आहे.

'पछताओगे'च्या सक्सेस पार्टीत टी-सीरिजचे मॅनेजिंग डिरेक्टर भूषण कुमारदेखील पहायला मिळाले. भूषण कुमार यांनी या सक्सेससाठी विकी व नोराची प्रशंसा केली. त्यांनी सांगितलं की, चांगल्या कलाकारांसोबत टीसीरिज यापुढेही म्युझिक अल्बम बनवित राहणार आहे. 

विकी कौशल शेवटचा 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटात झळकला होता. या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

टॅग्स :विकी कौशलनोरा फतेही