Join us

Video : बलम पिचकारी..! होळी पार्टीत कतरिना कैफला रंग लावताना दिसला विकी कौशल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 17:47 IST

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की विकी कतरिनाला रंग लावतो आहे.

ईशा अंबानीच्या घरी नुकतीच होळी पार्टी पार पडली. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींनी खूप धमालमस्ती केली. या पार्टीत प्रियंका चोप्रा, निक जोनास, जॅकलिन फर्नांडिस, विकी कौशल, कतरिना कैफ, हुमा कुरैशी यांच्यासोबत बरेच सेलेब्रिटी आले होते. या सर्वांचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. मात्र या फोटोंव्यतिरिक्त या पार्टीतल्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ आहे विकी कौशल आणि कतरिना कैफचा.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत विकी कौशल कतरिना कैफला रंग लावताना दिसतो आहे. दोघांना इतके क्लोज पहिल्यांदाच पाहिले गेले आहे. यापूर्वी ते दोघे एकत्र बऱ्याचदा काही इव्हेंट्स व फंक्शनमध्ये एकत्र दिसले आहेत. पण, मस्ती करताना हे दोघे पहिल्यांदाच दिसले.

विकी आणि कतरिना यांच्या रिलेशनशीपची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. काही रिपोर्ट्सनुसार दोघे सध्या एकमेकांच्या जास्त जवळ आले आहेत. काही दिवसांपूर्वी विकीने कतरिनासोबतच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले होते की ते दोघे फक्त चांगले फ्रेंड आहेत. 

विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच त्याचा भूत चित्रपट रिलीज झाला.

या चित्रपटाला हवा तितका चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. याशिवाय तो सरकार उधम सिंग व तख्त हे चित्रपटातही दिसणार आहे. तर कतरिना कैफबद्दल सांगायचं तर ती सूर्यवंशी सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :विकी कौशलईशा अंबानीकतरिना कैफ