Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: न्यूयॉर्कच्या रस्त्यावर वनिताने केला जबरदस्त डान्स; 'बडे मियाँ' गाण्यावर लावले देसी ठुमके

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 10:21 IST

Vanita kharat: सोशल मीडियावर गौरव आणि वनिताचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सध्याच्या घडीला वनिता खरात (vanita kharat)  हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अफलातून अभिनय आणि त्याला विनोदाची जोड यामुळे वनिता आज प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून वनिताने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.  वनिता सध्या अमेरिका दौऱ्यावर असून येथे चांगलीच धम्माल करतीये. नुकताच तिने येथील एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या महाराष्ट्राची हास्यजत्राची संपूर्ण टीम अमेरिका दौऱ्यावर आहे. त्यामुळे ही कलाकार मंडळी येथे हाऊसफूल शो करत आहेत. रसिकांचं प्रेम मिळत असतानाच फावल्या वेळात ही मंडळी अमेरिका फिरण्याचा पूरेपुर आनंद घेत आहेत. यामध्येच वनिता आणि अभिनेता गौरव मोरे यांनी न्यूयॉर्कच्या रहदारीच्या रस्त्यावर थेट बॉलिवूड गाण्यावर डान्स केला आहे.

गौरव मोरेने त्याच्या इन्स्टाग्रामवर वनितासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी बडे मियाँ, छोटे मियाँ या गाण्यावर डान्स करत आहेत. विशेष म्हणजे यांनी बॉलिवूड स्टाइलमध्ये हा डान्स केला असून मध्येच त्यांचा देसी ठुमका चाहत्यांना आवडला आहे. सध्या या व्हिडीओवर नेटकरी तुफान कमेंट करत आहेत. 

टॅग्स :वनिता खरातटेलिव्हिजनसेलिब्रिटी