Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: सोनाली खरे पोहोचली जपानला; कुटुंबासोबत घेतीये सुट्टीचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 18:07 IST

Sonali khare:उत्तम अभिनयासह फिटनेसमुळे ओळखली जाणारी सोनाली सध्या विदेश दौऱ्यावर आहे.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे (sonali khare). एका मुलीची आई असलेली सोनाली आजही फिट आणि सुंदर दिसते त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. उत्तम अभिनयासह फिटनेसमुळे ओळखली जाणारी सोनाली सध्या विदेश दौऱ्यावर आहे. येथील अनेक फोटो, व्हिडीओ व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाली सध्या तिच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. त्यामुळे ती तिच्या लेकी आणि नवऱ्यासह जपानला गेली आहे. सध्या हे कुटुंब जपानमध्ये फिरण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

अलिकडेच सोनालीचा नवरा अभिनेता बिजय आनंद याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या या जपान टूरचे काही फोटो कोलाज केले आहेत. यात या फॅमिलीने जपानमधील वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिल्याचं दिसून येत आहे. यात त्यांनी टोकियो डिझ्नी सी, Fushimi-Inari Temple यांसारख्या ठिकाणांना देखील भेट दिली. 

टॅग्स :सोनाली खरेसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा