Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : चोली के पीछे क्या है... 'धकधक गर्ल'चा असा डान्स की पाहातच राहिले पती डॉ. श्रीराम नेने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 13:40 IST

माधुरी दीक्षितचा डान्स पाहून नेटकरी तिचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. 

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै 2024 रोजी झालं. या लग्नाला देशातूनच नाहीतर विदेशातूनही लोक पोहोचले. या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. देशाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील 'शुभ आशिर्वाद' सोहळ्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना आशिर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूड कलाकार तर या लग्नात धमाल करतानाच दिसले. 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितनेही धमाकेदार डान्स केल्याचं पाहायला मिळालं. 

अनंत-राधिकाच्या लग्न सोळ्यात माधुरीने रंगत आणल्याचं दिसून आलं. एका व्हिडीओमध्ये माधुरी 'चोली के पीछे क्या है' या गाण्यावर डान्स करताना दिसून आली. इतक्या वर्षानंतरही माधुरीचा तोच नखरा आणि त्याच अदा पाहायला मिळाल्या. माधुरीला 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर डान्स करताना पाहून तिचे पती डॉ श्रीराम नेने 'धकधक गर्ल'ला पाहातच राहिले. हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. माधुरी दीक्षितचा डान्स पाहून नेटकरी तिचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. 

दरम्यान, बॉलिवूडमध्ये १९९३ मध्ये म्हणजेच बरोबर ३१ वर्षांपूर्वी 'खलनायक' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आलेल्या 'चोली के पीछे क्या है…' या आयकॉनिक गाण्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. अलका याग्निक आणि ईला अरुण यांनी गायलेलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे. आता २०२४ मध्ये 'चोली के पीछे क्या है…' या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पण, यावेळी माधुरीच्या जागी या गाण्यावर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान अर्थात बेबो थिरकताना दिसली.  

टॅग्स :माधुरी दिक्षितसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडियाअनंत अंबानीमुकेश अंबानी