Ankita Lokhande-Vicky Jain wedding: नुकतंच कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vickey Kaushal) यांचा विवाहसोळला पार पडला. अनेक ठिकाणी या विवाह सोहळ्याची चर्चाही झाली. परंतु आता मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हीच्या विवाहाची चर्चा सुरू झाली आहे. अंकिता आपला बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vickey Jain) सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सध्या त्यांनी केलेलं प्री वेडिंग शूट हे चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक चाहत्यांनीही त्यांच्या या प्री वेडिंग शूटला पसंती दर्शवली आहे. अंकिता लोखंडेनं अगदी बॉलिवूड स्टाईनं आपल्या लग्नाचं प्री वेडिंग शूट केलंय. यामध्ये जबरदस्त लोकेशन्सचीही निवड केल्याचं दिसून येतं. दरम्यान, हे शूट दुबईत केल्याचंही समजतंय. परंतु अंकितानं याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अंकिता या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहे. काहींनी लोकांनी तर हा व्हिडीओ अतिशय जबरदस्त असल्याचं म्हटलंय.
Video : अंकिता लोखंडेनं केलं Pre-wedding शूट; फॅन्स म्हणाले, "जबरदस्त"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 12:20 IST