Join us

अंकिताची भीती खरी ठरली; घराबाहेर पडताच विकी दिसला मुलींच्या गोतावळ्यात; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 13:31 IST

Vicky jain: अंकिताने हजार वेळा बजावल्यानंतरही विकीने तेच केलं ज्याचा अभिनेत्री विरोध करत होती.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त बिग बॉस (Bigg boss) या कार्यक्रमाचं यंदाचं 17 वं पर्व अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलं. यात खासकरुन अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande)आणि विकी जैन यांच्या नात्याची तर प्रचंड चर्चा रंगली. लवकरच या  कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यापूर्वीच या शोमधून विकी जैन (vicky jain) बाहेर पडला. विशेष म्हणजे  शो मध्ये चर्चेत राहणारा विकी घराबाहेर पडल्यानंतरही चर्चेत येत आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो शोमधून बाहेर पडल्यानंतर पार्टी करताना दिसत आहे.

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर विकीने सगळ्यात प्रथम पार्टी केली आहे. या पार्टीचे फोटो त्याच्या बहिणीने खुशी जैन हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये  बिग बॉस 17 मधून बाहेर  पडलेल्या आयेशा खान, इशा मालवीय आणि सना रईस या तिघी सुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे अंकिताला वाटत असलेली भिती खरी ठरली आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पार्टी करु नकोस असं अंकिताने हजारदा विकीला बजावलं होतं. मात्र, तिचा शब्द मोडून विकीने पार्टी केली. त्यामुळे सोशल मीडियावर विकीची चांगलीच चर्चा रंगली आहे. विकीच्या बहिणीने त्यांच्या हाऊस पार्टीचे फोटो शेअर करत, ‘भाई परत आला आहे. विकीच खरा विजेता आहे’, असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान,विकीचे हे फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी पुन्हा त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ‘अंकिता अजिबात खुश होणार नाही’, असं एकाने म्हटलं आहे.,  तर ‘विकी फक्त मुलींसोबतच पार्टी करतोय’,असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. विकी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता टॉप 5 मध्ये मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अरुण माशेट्टी आणि अभिषेक कुमार हे स्पर्धक पोहोचले आहेत.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडेसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार