Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रविणा देशपांडे यांचं निधन, 'तस्करी' सीरिज शेवटची ठरली; ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:25 IST

Pravina Deshpande Passes Away: कॅन्सरवर केली होती मात, इमरान हाश्मीच्या 'तस्करी'मध्ये साकारेली भूमिका; सलमान खानसोबतही केलंय काम

Pravina Deshpande Death: ज्येष्ठ अभिनेत्री प्रविणा देशपांडे यांचं निधन झालं आहे. मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीत त्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसल्या. मालिका, सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता ज्यावर त्यांनी मात केली होती. २०२३ मध्ये त्या पुन्हा काम करायला लागल्या होत्या. मात्र आता ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुलं आहेत. 

प्रविणा देशपांडे यांच्या सोशल मीडिया अकाऊंवरुनच त्यांच्या निधनाची बातमी कळवण्यात आली आहे. त्यांचा फोटो पोस्ट करत लिहिले,"कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की मिसेस प्रविणा देशपांडे यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ३ वाजता अंधेरी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील."

 प्रविणा देशपांडे यांनी 'घर एक मंदिर','कुमकुम','करम अपना अपना' आणि 'कुल्फी कुमार बाजेवाला' या मालिकांमध्ये काम केलं. तसंच जलेबी, सलमान खानचा 'रेडी' या सिनेमातही त्या झळकल्या होत्या.  नुकतंच इमरान हाश्मीच्या 'तस्करी' वेबसीरिजमध्ये त्यांना पाहिलं गेलं. ही त्यांची शेवटची सीरिज ठरली. तसंच सलमान खानच्या 'रेडी' सिनेमातली त्यांची भूमिका लक्षात राहिली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Pravina Deshpande passes away at 60; 'Taskari' last series.

Web Summary : Veteran actress Pravina Deshpande passed away at 60 after battling blood cancer. She worked in Marathi and Hindi films and TV series like 'Ghar Ek Mandir', 'Ready', and 'Taskari'. Her final appearance was in 'Taskari'.
टॅग्स :मराठी अभिनेतामृत्यूबॉलिवूडटिव्ही कलाकार