Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आपण शेवटपर्यंत लढलो बाबा..'; अभिनेते विवेक लागूंच्या निधनानंतर मुलीची भावुक पोस्ट

By देवेंद्र जाधव | Updated: June 20, 2025 09:59 IST

Vivek Lagoo Death: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागूंचं काल दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विवेक यांची मुलगी मृण्मयीने सोशल मीडियावर बाबांना भावुक पोस्ट करुन श्रद्धांजली वाहिली आहे

Vivek Lagoo Death: काल ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन झालं. विवेक लागू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील अनेकांनी शोक व्यक्त केला. विवेक लागू हे मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी, टेलिव्हिजन क्षेत्रातील शिस्तप्रिय नट होते. विवेक लागूंच्या निधनाने अनेक कलाकार आणि त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. विवेक लागू यांची मुलगी मृण्मयी लागू सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. मृण्मयी लागूने बाबांच्या निधनानंतर सोशल मीडियावर केलेली भावुक पोस्ट चर्चेत आहे. 

मृण्मयीने बाबांसाठी लिहिली भावुक पोस्ट

मृण्मयी लागूने सोशल मीडियावर बाबांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करुन मृण्मयी लिहिते, "आम्ही बराच काळ एकत्र लढलो, पण आता फक्त प्रेम आणि कृतज्ञतेने तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. माझे बाबा! माझा सर्वात चांगला मित्र, माझा मार्गदर्शक, माझा एक नंबरचा चाहता आणि माझ्या मनातला आवाज... मला तुमची आठवण येईल... तुम्ही एका मुलीसाठी सर्वोत्तम बाबा होतात.", अशा शब्दात मृण्मयीने वडिलांविषयी भावुक पोस्ट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विवेक लागूंची कारकीर्द

विवेक लागू यांनी १९७८ साली रीमा लागू यांच्याशी लग्न केलं होतं. रंगभूमीवर काम करतानाच त्यांची ओळख झाली होती. पहिल्या नजरेतच दोघं प्रेमात पडले होते. १९८८ साली त्यांना मुलगी झाली. तिचं नाव मृण्मयी लागू आहे. विवेक लागू यांनी १९७८ साली रीमा लागू यांच्याशी लग्न केलं होतं. रंगभूमीवर काम करतानाच त्यांची ओळख झाली होती. पहिल्या नजरेतच दोघं प्रेमात पडले होते. १९८८ साली त्यांना मुलगी झाली. तिचं नाव मृण्मयी लागू आहे. आज विवेक लागूंवर ओशीवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूडमराठी अभिनेतारिमा लागूमराठी चित्रपट