बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेके पुनीत इस्सर यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पुनीत यांनी 'बॉर्डर', 'कुली' यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. पुनीत यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सलमान खानविषयी मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सलमानने मला न विचारता बिग बॉसमध्ये सहभाग घेण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती केली, असा आरोप पुनीत यांनी केलाय. काय म्हणाले? जाणून घ्या.
सलमानने माझ्यावर जबरदस्ती केली
सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत पुनीत यांनी हा खुलासा केला. ते म्हणाले की, "मी सलमान खानसोबत एक सिनेमा बनवत होतो. त्यावेळी मी त्याला स्क्रिप्ट ऐकवायला त्याच्या घरी जायचो. पण तेव्हा सलमान बिग बॉसच्या घरात असायचा. त्यामुळे तो मला तिकडे बोलवायचा. एकदा बिग बॉसच्या टीमने मला बघितलं. त्यांनी मला बिग बॉसच्या घरात टाकण्याचा परस्पर निर्णय घेतला. ही टीम सलमानजवळ गेली आणि त्यांनी हा विचार त्याला सांगितला. त्यावेळी सलमानने त्यांना होकार दिला. मी त्याला म्हटलं, वेडा आहेस का? मला नाही करायचं. मी सिनेमा दिग्दर्शित करतोय त्यामुळे हे सर्व नको."
"त्यावेळी सलमान म्हणाला, पुन्स, तुला हे करावंच लागेल. एक काम कर, एक-दोन आठवड्यासाठी बिग बॉसमध्ये जा. त्यानंतर तुला मी बाहेर काढेल. अशाप्रकारे सलमान खानने मला फसवलं. त्याने जबरदस्ती मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास सांगितलं. सलमानने नंतर ंमला एका कागदावर साईन करायला सांगितलं. तो म्हणतोय म्हणून मी सही केली. मी घरी आल्यावर माझ्या मुलीला हे सर्व सांगितलं. मुलगी म्हणाली, पप्पा तुम्ही वेडे आहात का? बिग बॉस काय आहे तुम्हाला माहितीये? त्यानंतर मुलीने मला एक-दोन एपिसोड दाखवले आणि मी घाबरलो." अशाप्रकारे पुनीत यांनी हा मोठा खुलासा केला.