Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ved Marathi Movie : पुण्यात ढोल ताशाच्या गजरात 'वेड'चे प्रमोशन; रितेश जेनेलियाची विद्यार्थ्यांसोबत धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 11:48 IST

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश जेनेलिया पुण्यात होते अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये त्यांनी सिनेमाचे प्रमोशन केले आहे

रितेश देशमुख आणि जेनेलिया ही सुपरक्युट जोडी 'वेड' सिनेमातुन प्रेक्षकांना भेटायला येत आहे. वेडचं टीझर, अजय अतुलची गाणी बघुन चाहत्यांना खरंच वेड लावले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश जेनेलिया पुण्यात होते अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये त्यांनी सिनेमाचे प्रमोशन केले आहे. (Ved Marathi Movie)

ढोलताशाच्या गजरात 'वेड'चे प्रमोशन 

पुण्यातील झील इन्स्टिट्युट मध्ये रितेशने विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त ढोल ताशा वाजवत सिनेमाचे प्रमोशन केले. मोठ्या संख्येने पुणेकर तरुणांनी गर्दी केली होती. वेडची दोन गाणी आत्तापर्यंत रिलीज झाली आहेत. त्यातल्या बेसुरी गाण्याने तर चाहत्यांना मंत्रमुग्ध केलंय. हे गाणंही यावेळी लावण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये जात रितेशने ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. पुणेकरांनीही त्याला तेवढाच प्रतिसाद दिला.

३० डिसेंबर रोजी वेड चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्या आधीच गाणी, रितेशचा लुक याने चाहत्यांना वेड लावले आहे. जेनेलिया पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करत आहे तर रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजामहाविद्यालयविद्यार्थी