Join us
Daily Top 2Weekly Top 5

Valentines Day: "मला प्रेम मिळालं", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, म्हणाली- "तो म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:53 IST

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीलाही व्हॅलेंटाइन डेचं खास गिफ्ट मिळालं आहे. 

आज सगळीकडे 'व्हॅलेंटाइन डे'चा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र प्रेमाचे वारे वाहत आहेत. आपल्या पार्टनरसोबत प्रेमी युगुलं व्हॅलेंटाइन डे साजरा करताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटीही व्हॅलेंटाईन डेचं खास सेलिब्रेशन करत आहेत. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीलाही व्हॅलेंटाइन डेचं खास गिफ्ट मिळालं आहे. 

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने तिला व्हॅलेंटाइन गिफ्ट मिळाल्याचं म्हटलं आहे. याबरोबरच हे गिफ्ट कोणी दिलंय याचा खुलासाही अभिनेत्रीने केला आहे. प्राजक्ताने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कारसोबत पोझ दिल्या आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने "मला प्रेम मिळालं...वेडेपणा", असं कॅप्शन दिलं आहे. 

खरं तर प्राजक्ताला तिच्या चाहत्यांनीच व्हॅलेंटाइन गिफ्ट दिलं आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर २.३ मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे. चाहत्यांकडून मिळालेलं हेच व्हॅलेंटाइन गिफ्ट असल्याचं तिने म्हटलं आहे. "इन्स्टाग्रामवर २.३ मिलियन फॉलोवर्स...मला माझं व्हॅलेंटाइन गिफ्ट मिळालं. काय योगायोग आहे. तो म्हणजे तुम्ही सगळे आहात. हॅपी व्हॅलेंटाइन्स डे", असं कॅप्शन तिने दिलं आहे. 

दरम्यान, प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. अलिकडेच तिचा फुलवंती सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच तिने निर्मिती बाजूही सांभाळली होती. 

टॅग्स :प्राजक्ता माळीटिव्ही कलाकारव्हॅलेंटाईन्स डे