Join us

Video: केवळ अभिनेताच नव्हे तर उत्तम सुद्धा शेफ आहे वैभव मांगले; मुलांसाठी केला पनीर पराठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 18:53 IST

Vaibhav mangale: वैभव मांगले यांनी या व्हिडीओमध्ये पनीर पराठा कशाप्रकारे केला याची रेसिपी सुद्धा सांगितली आहे.

विविधांगी भूमिका साकारुन मराठी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे वैभव मांगले (vaibhav mangale). नाटक, मालिका आणि सिनेमा अशा सगळ्याच माध्यमांमध्ये त्यांचा वावर आहे. त्यामुळे त्यांची कलाविश्वात आणि सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. वैभव मांगले उत्तम अभिनेता असण्यासोबतच चांगले शेफ सुद्धा आहेत. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक छानसा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

वैभव मांगले कलाविश्वासह सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय आहेत. त्यामुळे ते कायम नवनवीन पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असतात. यावेळी त्यांनी चाहत्यांसोबत चक्क पनीर पराठ्याची रेसिपी शेअर केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एका उत्तम गृहिणीप्रमाणे सुरेख असा पराठा तयार केला आहे. ज्यामुळे नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

वैभव यांनी व्हिडीओ शेअर करत हा पराठा कशाप्रकारे करायचा याची रेसिपी सुद्धा शेअर केली आहे. त्यांनी खास त्यांच्या मुलांसाठी हा पराठा तयार केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत येत असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :वैभव मांगलेटिव्ही कलाकारटेलिव्हिजनसिनेमा