Join us

वहिनीसाहेबांचे पप्पा ऑस्ट्रेलियात करतात 'हा' व्यवसाय; पाहा धनश्रीने शेअर केलेला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 16:17 IST

Dhanashri kadgaonkar: या व्हिडीओमध्ये तिने तिच्या पप्पांचे गोडवे गायले आहेत.त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे. 

छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब अर्थात धनश्री काडगांवकर (dhanashri kadgaonkar) हे नाव कोणत्याही प्रेक्षकासाठी नवीन नाही. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळलेली धनश्री लवकरच तू चाल पुढं या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मधल्या काळात तिने कलाविश्वामधून ब्रेक घेतला होता. मात्र, तरीदेखील प्रेक्षकांनी तिच्यातील वहिनीसाहेब लक्षात ठेवली. आजही 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील तिचे काही डायलॉग्स लोकप्रिय आहेत. असा एक डायलॉग धनश्रीने रिक्रिएट केला आहे.

धनश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम इन्स्टाग्राम रिल्स, फोटोच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. यावेळीदेखील तिने असंच एक मजेशीर रिल शेअर केलं आहे. यात व्हिडीओमध्ये तिने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एक डायलॉग रिक्रिएट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या पप्पांचे गोडवे गायलामुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे.  

“हे तर काहीच नाही, तू म्हणलंस ना आत्ता ऑस्ट्रेलिया… त्या ऑस्ट्रेलियामध्ये आमच्या पप्पांची पन्नास एकर जमीन आहे. आणि त्या पन्नास एकर जमिनीत कांगारूंचं कुक्कूटपालन पण होतंय.” असं धनश्री या व्हिडीओमध्ये म्हणते. तसंच हा व्हिडीओ शेअर करत तिने भन्नाट कॅप्शनही दिलं आहे.

 “चला म्हणलं आपल्या या डायलॉग वर अनेक जण रील करत आहेत , तर आपण पण करून बघावं ...खरं तर हा सिरीयल मधला डायलॉग नाही , चला हवा येऊ द्या ला घेतलेला हा डायलॉग इतका viral आणि फेमस होईल असं कधीच वाटलं नव्हतं ... पण आज पण हे रील गाजतंय , अनेक मुली या वर रील करून मला टॅग करतात , पाठवतात , खूप मस्त वाटतं ..तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद ..आता एक नवीन सिरीयल येतेय.. @tuchalpudha_official तिथे ही असच प्रेम द्या .. , असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, कांगारुचं कुक्कूटपालन हे ऐकताच नेटकऱ्यांना हसू फुटतं. तिच्या या व्हिडीओवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा डायलॉग मालिकेतील नसून हवा येऊ द्या कार्यक्रमात तिने म्हटला होता. 

टॅग्स :धनश्री काडगावकरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार