Join us

अल्लू अर्जुनच्या गाण्यावर उत्कर्ष शिंदेचा रोमँटिक डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:30 IST

'पुष्पा २'मधील फिलिंग हे गाणंही प्रचंड व्हायरल झालं. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या या गाण्याची अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेला भुरळ पडली आहे.

Pushpa 2: पुष्पाप्रमाणेचअल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'नेदेखील चाहत्यांना भुरळ घातली आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच 'पुष्पा २'मधील गाणी व्हायरल झाली होती. सोशल मीडियावर चाहत्यांनी या गाण्यांवर रील्सही बनवले. 'पुष्पा २'मधील फिलिंग हे गाणंही प्रचंड व्हायरल झालं. या गाण्यात पुष्पा आणि श्रीवल्लीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या या गाण्याची अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेला भुरळ पडली आहे. त्यानेदेखील 'पुष्पा २'मधील या गाण्यावर डान्स केला आहे. 

उत्कर्ष शिंदेने अल्लू अर्जुनच्या फिलिंग गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत उत्कर्ष शिंदेने पुष्पासारखा लूक केला आहे. या व्हिडिओत त्याच्याबरोबर अभिनेत्री झाबा शेखही डान्स करताना दिसत आहे. उत्कर्ष शिंदेच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच अल्लू अर्जुनच्या पुष्पाने अख्खं मार्केट खाऊन टाकलं आहे. बॉक्स ऑफिस आणि थिएटरमध्येही केवळ 'पुष्पा २'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. लवकरच 'पुष्पा २' १००० कोटींचा टप्पा पार करेल. 

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाटिव्ही कलाकारमराठी अभिनेता