Join us

"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:12 IST

उर्वशीने रोनाल्डो आणि मेस्सीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये उर्वशीने काम केलं आहे. पण, बॉलिवूडमधील करिअरपेक्षा उर्वशी तिच्या पर्सनल आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. उर्वशीचं नाव काही क्रिकेटरसोबत जोडलं गेलं होतं. पण, आता मात्र उर्वशी चर्चेत आली आहे ती फुटबॉलपटू क्रिस्टियाने रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यामुळे. उर्वशीने रोनाल्डो आणि मेस्सीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

उर्वशीने नुकतीच iDiva ला मुलाखत दिली. या मुलाखतीतील रॅपिड फायरमध्ये उर्वशीला काही प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये तिला "बॉलिवूडमधील कोणाबरोबर लव्ह ट्रँगलमध्ये राहायला आवडेल?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना उर्वशीने बॉलिवूड अभिनेत्याचं नाव न घेता रोनाल्डो आणि मेस्सीचं नाव घेतलं. "मला क्रिस्टियाने रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याबरोबर लव्ह ट्रँगलमध्ये राहायला आवडेल", असं उर्वशी म्हणाली. 

अभिनेत्रीने प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियाने रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. उर्वशीचं नाव याआधी क्रिकेटर ऋषभ पंतबरोबर जोडलं गेलं होतं. ते एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटरबरोबरही उर्वशीच्या अफेअरच्या चर्चा होत्या. 

टॅग्स :उर्वशी रौतेलाख्रिस्तियानो रोनाल्डोलिओनेल मेस्सी