Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषभ पंतला भेटण्यासाठी उर्वशी रौतेला रुग्णालयात? पोस्ट केलेल्या 'या' फोटोमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 10:16 IST

अशात उर्वशीने रुग्णालायात जाऊन ऋषभची भेट घेतली, असा अंदाज, युजर्स व्यक्त करत आहेत.

ऋषभ पंतच्या अपघातानंतर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने गुरुवारी इंस्टा स्टोरीवर मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे. तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर, उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती, असा कयास लोक लावत आहेत.

उर्वशीने केली अशी पोस्ट -उर्वशी खरोखरच ऋषभ पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली  होती की नाही, याची पुष्टी झालेली नाही. पण, ऋषभ ज्या रुग्णालयात आहे, त्या रुग्णालयाचा फोटो तिने अचानक इन्स्टा स्टोरीवर शेअर करणे लोकांच्या समजण्यापलीकडचे आहे. अशात उर्वशीने रुग्णालायात जाऊन ऋषभची भेट घेतली, असा अंदाज, युजर्स व्यक्त करत आहेत. यापूर्वी एकदा ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी आली होती. मात्र, या दोघांनीही या नात्याचा स्वीकार केला नाही. याउलट दोघांमधील कोल्डवॉर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते.

ट्रोल होतेय उर्वशी -उर्वशी रौतेला एखाद्या ठिकाणी गेली अथवा तिने एखादी पोस्ट केली, की बऱ्याच वेळा युजर्स तिला ऋषभच्या नावाने ट्रोल करताना दिसतात. उर्वशी रौतेलाच्या अनेक पोस्ट्सवरून असे दिसून येते, की ती स्वतःच ट्रोलर्सना असे करण्यासाठी आमंत्रित करते. जसे की, आता तिने रुग्णालयाचा फोटो शेअर केला आहे. तोही त्या रुग्णालयाचा, जेथे क्रिकेटर ऋषभ पंत दाखल आहे. यूजर्स याला चीप पब्लिसिटी म्हणतानाही दिसत आहेत. 

टॅग्स :रिषभ पंतउर्वशी रौतेलाबॉलिवूड