Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या १७ व्या वर्षी बनली आई, २ वर्षात घटस्फोट, पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली ही टीव्ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 11:11 IST

लग्नानंतर दोनच वर्षांनी ती पतीपासून विभक्त झाली. त्यानंतर तिने लग्न केले नाही.

टीव्हीवरील प्रसिद्ध खलनायिका समजली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi dholakia) उर्फ ​​'कोमोलिका' पुन्हा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. आजही लोक तिला 'कसौटी जिंदगी की' (kasuti zindagi ki) मधील कोमोलिका म्हणून ओळखतात. 'नागिन 6'मध्ये उर्वशी खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.  उर्वशी ढोलकिया केवळ तिच्या व्यक्तिरेखेमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

 उर्वशीचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाले. वयाच्या 17 व्या वर्षी तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. दोघांचे नाव सागर आणि क्षितिज असे होते. लग्नानंतर दोनच वर्षांनी उर्वशी पतीपासून विभक्त झाली. त्यानंतर उर्वशीने लग्न केले नाही. तसेच दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. उर्वशीने एकटीने तिच्या दोन्ही मुलींचा सांभाळ अतिशय चांगल्याप्रकारे केला. तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिच्या मुलांचे फोटो पाहायला मिळतात.

उर्वशी अनुजसोबत नात्यात असल्याची मीडियात अनेकवेळा चर्चा होत होती. पण त्या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत मीडियात काहीही न बोलणेच पसंत केले होते. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येत असे. ते दोघे लग्न करतील असे वाटत असतानाच त्या दोघांचे ब्रेकअप झाले. अनुजपेक्षा उर्वशी मोठी असल्याने आणि त्यातही तिला दोन मुले असल्याने अनुजची आई या नात्यासाठी तयार नव्हती असे म्हटले जाते.

उर्वशी आणि अनुज यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अनेक महिन्यानंतर स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने सांगितले होते की, मला या नात्याबद्दल कधीच बोलायचे नव्हते. मी माझ्या खाजगी आयुष्याविषयी कधीही न बोलणेच पसंत करते. पण आता मी अनेक महिन्यांनी सांगत आहे की, आम्ही दोघे नात्यात होतो. उर्वशीही अनुजसोबत 'नच बलिए'मध्ये दिसली होती. उर्वशीने घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली, कही तो होगा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

टॅग्स :उर्वशी ढोलकियाटिव्ही कलाकार