Join us
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार इंद्रायणी; मालिकेचा नवा प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 17:04 IST

Indrayani: उत्कंठा वाढवणारा इंद्रायणीचा नवा प्रोमो प्रदर्शित

छोट्या पडद्यावर सध्या  इंद्रायणी या नव्या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. एका चिमुकल्या लहान मुलीचं बालविश्व या मालिकेतून उलगडलं जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे अनेक प्रोमो व्हायरल होत असून नुकताच त्याचा आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चिमुकल्या इंदूला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

निरागस, सालस, अवखळ, निष्पाप अशा  इंदूची झलक आपल्याला पहिल्या २ प्रोमोमधून दिसली आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. यामध्येच या मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला. या प्रोमोमध्ये अभिनेत्री अनिता दाते हिच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये आनंदी बाई म्हणजेच अनिता दाते मंदिरातील पैसे चोरताना दिसते. तिची ही चोरी चिमुकली इंदू पकडते. त्यावर, आनंदी तिला घाबरवायचा प्रयत्न करते. त्यामुळे या मालिकेत अनिता नकारात्मक भूमिका साकारणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

प्रोमोमध्ये धूर्त कावेबाज आनंदी विरूद्ध निरागस पण खट्याळ इंदूमध्ये रंगलेला डाव दिसत आहे. त्यामुळे आता हा डाव कोण जिंकणार, हे येत्या २५ मार्चपासून प्रेक्षकांना कळणार आहे.

दरम्यान, इंद्रायणी या मालिकेत सांची भोईर या चिमुकलीने इंदूची भूमिका साकारली आहे. सांची ही मूळची साताऱ्याची आहे. या मालिकेत सांचीसोबतच लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठकदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारअनिता दाते