Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्याचं करिअर संपण्यामागचं कारण आज समजलं'; राकेश बापटवर 'या' माजी स्पर्धकाने केली जळजळीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 15:03 IST

Bigg boss 15: वूट सिलेक्टने अलिकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनालेचा एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये राकेश, तेजस्वीवर संतापल्याचं दिसून आलं.

छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस १५' (bigg boss 15) या शोचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे लवकरच यंदाच्या पर्वाची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच या ग्रँड फिनालेमध्ये घरातील स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांचे कुटुंबीयदेखील या शोमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी शमिताला प्रोत्साहन देण्यासाठी तिची आई आणि प्रियकर राकेश बापट आले होते. यावेळी राकेशने शमिताची बाजू घेत तेजस्वीला खडेबोल सुनावले. परंतु, त्याचं वागणं बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट मुस्कान जट्टानाला फारसं रुचलं नाही. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर त्याच्या करिअरवरदेखील बोट उचललं आहे.

वूट सिलेक्टने अलिकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनालेचा एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये राकेश, तेजस्वीवर संतापल्याचं दिसून आलं. करण आणि शमिताच्या मैत्रीला तेजस्वीने चुकीचं नाव दिल्यामुळे तो संतापला होता. इतकंच नाही तर त्यावेळी टीव्ही फोडावासा वाटला असंही त्याने म्हटलं. त्याचा हा प्रोमो पाहिल्यावर मुस्काने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने राकेशला खडे बोल सुनावले आहेत.

"राकेश केवळ वेडाच नाही तर एक वाईट अभिनेतादेखील आहे. त्याचं करिअर संपलंय. आणि, त्याचं कारणही समजलंय. आणि, मी शमिता किंवा तेजस्वीला सपोर्ट करत नाही. परंतु, राकेश मुर्खांचा राजा आहे", अशी पोस्ट मुस्कानने शेअर केली आहे.

दरम्यान, मुस्कान जट्टाना ही बिग बॉस ओटीटीमध्ये झळकली होती. सध्या बिग बॉस १५ चा ग्रँड फिनाले रंगणार आहे.यावेळी विजेत्या स्पर्धकाला ५० लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. तसंच बिग बॉसची ट्रॉफीदेखील

टॅग्स :राकेश बापटबिग बॉसटेलिव्हिजनटिव्ही कलाकार