Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुबेहूब आईप्रमाणे दिसतो छोटा लिंबाचिया; भारती सिंहने शेअर केली बाळाची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 10:36 IST

Bharti singh: भारतीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिल्यापासून सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा रंगली होती. या बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते.

कलाविश्वात आज बरेचसे विनोदवीर आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये महिला विनोदवीरांची संख्या फार मोजकी आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे भारती सिंह (bharti singh). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर भारती सगळ्या विनोदवीरांना पुरून उरली आहे. त्यामुळेच आज ती प्रसिद्ध लाफ्टरक्वीन म्हणून ओळखली जाते.  काही महिन्यांपूर्वीच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला असून त्याचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

भारतीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिल्यापासून सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा रंगली होती. या बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. इतकंच नाही तर भारतीदेखील सोशल मीडियावर या बाळासंदर्भातील पोस्ट शेअर करायची. मात्र, त्याचा चेहरा तिने रिव्हिल केला नव्हता. अखेर बऱ्याच महिन्यानंतर तिने बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.

भारतीने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. यात भारती आणि हर्षने त्यांच्या बाळासोबत छानसं फोटोशूट केलं आहे. 'भेटा आमच्या मुलाला लक्ष्यला' , असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे भारतीचं बाळ हुबेहूब तिच्या नवऱ्याप्रमाणे म्हणजेच हर्ष लिंबाचियाप्रमाणे दिसत असल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.

दरम्यान, भारतीने ३ डिसेंबर २०१७ रोजी हर्ष लिंबाचियासह लग्नगाठ बांधली. त्यानंतर भारतीने ३ एप्रिल २०२२ रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. या बाळाचं नाव लक्ष्य असं असून भारती त्याला प्रेमाने गोला असं म्हणते.

टॅग्स :भारती सिंगसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार