Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता..' सोडल्यावर गुरुचरणला मिळाले नाहीत कष्टाचे पैसे; अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 11:04 IST

Asit Modi: गुरुचरण सिंह आर्थिक संकटात असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच त्यांना तारक मेहता सोडल्यावर पैसेही मिळाले नव्हते. या सगळ्यावर असित मोदींनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम गुरुचरण सिंह बेपत्ता होऊन आता बरेच दिवस लोटले आहेत. एकीकडे त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे त्यांच्याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यामध्येच गुरुचरण सिंह यांच्यावर आर्थिक संकट होतं. इतकंच नाही तर त्यांनी तारक मेहता शो सोडल्यानंतर त्यांना पैसेही मिळाले नव्हते असं म्हटलं जात आहे. यावर आता शो चे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी मौन सोडलं आहे.

असित मोदी यांनी अलिकडेच 'टाइम्स नाऊ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी गुरुचरण यांच्या बेपत्ता होण्याविषयी आणि त्यांच्या एकंदरीत स्वभावाविषयी भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले असित मोदी?

"हे खरंच फार धक्कादायक आहे. गुरुचरणचं त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. आई-वडिलांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आमच्या दोघांचा वैयक्तिक असा संबंध नव्हता. पण, मी त्याला जितकं ओळखतो त्यानुसार तो प्रचंड धार्मिक व्यक्ती होता. गुरुचरणने  कोविडच्या काळात तारक मेहता सोडलं होतं. पण, शो सोडल्यावरही आमची मैत्री होती. तो कधीही भेटला की कायम हसतमुख असायचा. मात्र,त्याचं अचानक असं गायब होणं खरंच फार धक्कादायक आहे. त्याचा शोध सुरु आहे. मला आशा आहे की नक्कीच काही तरी चांगलं घडेल. आम्ही ६-७ महिन्यांपूर्वी अखेरचं भेटलो होतो," असं असित मोदी म्हणाले.

'तारक मेहता' सोडल्यावर गुरुचरणला मिळाले नाही पैसे?

गुरुचरण यांनी तारक मेहता सोडल्यावर त्यांना पैसे मिळाले नाहीत अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होतीये. यावरही असित मोदींनी भाष्य केलं. तारक मेहता सोडल्यावर गुरुचरणला पैसे मिळाले नव्हते असं काही नाही. तो काळ सगळ्यांसाठीच किती तणावपूर्ण होता हे सगळ्यांनाच माहित आहे. मालिकेचं चित्रीकरण रखडलं होतं. हा शो पुढे सुरु राहील की नाही हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं. तो काळ आमच्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होता.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनटिव्ही कलाकार