Join us
Daily Top 2Weekly Top 5

"जोडीदाराचा शोध आता थांबवला" टीव्ही अभिनेत्री श्रीति झाने वैयक्तिक आयुष्याबद्दल केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:10 IST

श्रीतिने प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबाबतीत बरेच खुलासे केले.

अभिनेत्री श्रीति झा (Sriti Jha) टेलिव्हिजनवर चांगलीच लोकप्रिय आहे. 2014-21 या दरम्यान आलेल्या 'कुमकुम भाग्य' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. यानंतर मात्र ती कोणत्याच मालिकेत दिसली नाही. आता ब्रेकनंतर ती 'कैसे मुझे तुम मिल गए' मालिकेतून कमबॅक करत आहे. प्रेम, लग्न या विषयावर मालिकेची कथा आधारित आहे.

श्रीतिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबाबतीत बरेच खुलासे केले. ती म्हणाली,'मला आता कोणीच लग्न कधी करणार हा प्रश्न विचारत नाहीत. कारण आता खूप उशीर झाला आहे. मी माझ्यासाठी लाईफ पार्टनर शोधणं बंद केलंय. मला वाटतं लग्नासाठी तुम्हाला योग्य पार्टनर मिळाला पाहिजे. लग्नासाठी कोणती वेळ नसते. जर योग्य पार्टनर लवकर मिळाला तर लगेच लग्न करुन मोकळे व्हा नाहीतर ठिके..हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. १०० वर्ष जुन्या परंपरा पुढे नेणं गरजेचं नाही.'

श्रीतिचा लग्नसंस्थेवर विश्वास आहे का? यावर ती म्हणाली,'मी लग्नसंस्थेला मानते. मला स्वत:ला लग्न करण्याची इच्छा आहे. मला माझं कुटुंब हवं आहे. पण हे तेव्हाच जेव्हा मला स्ट्राँग पार्टनरशिप निभावणारा मुलगा मिळेल. आणि अगदी नाही मिळाला तरी काहीच हरकत नाही. सध्या मी माझ्या आयुष्यात खूप खूश आहे.'

श्रीति पार्टनरच्या अजूनही शोधात आहे का? यावर ती म्हणाली, 'नाही, आता मी जोडीदाराचा शोध थांबवला आहे. आता कोणी असंच मार्गात दिसलं तर मजा येईल. आता मला आरामाचं आयुष्य जगायचं आहे.'

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्नसेलिब्रिटी