Join us

"मी रोज तुझ्या प्रेमात...", रेश्मा शिंदेची नवऱ्याच्या वाढदिवशी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:18 IST

आज रेश्माचा पती पवनचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रेश्माने खास पोस्ट शेअर केली आहे. 

'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. काही महिन्यांपूर्वीच रेश्माने लग्नाच्या बेडीत अडकून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर रेश्माने पतीसोबत पहिला गुढीपाडवादेखील साजरा केला. आज रेश्माचा पती पवनचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रेश्माने खास पोस्ट शेअर केली आहे. 

रेश्मा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. आता पतीच्या वाढदिवशी अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रेश्माने पती पवनसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "मी प्रत्येक दिवशी तुझ्या प्रेमात पडते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. रेश्माच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी पवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

रेश्माने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पवनसोबत लग्नगाठ बांधली. पवन साऊथ इंडियन असून  त्या दोघांनी महाराष्ट्रीयन आणि साउथ पद्धतीने लग्न केलं. पवनी आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून तो युकेमध्ये होता. मात्र लग्नानंतर रेश्मासाठी तो भारतात परतला आहे.

टॅग्स :रेश्मा शिंदेटिव्ही कलाकार