रेश्मा शिंदे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रेश्माने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. रेश्माचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते.
रेश्मा अनेकदा रीलही शेअर करताना दिसते. आता नुकतंच तिने इन्स्टाग्रामवरील ट्रेण्ड फॉलो करत तिच्या ऑनस्क्रीन लेकीबरोबर रील बनवला आहे. रेश्मा सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती जानकीची भूमिका साकारत आहे. तर तिची लेक ओवीची भूमिका बालकलाकार आरोही सांभरे साकारताना दिसत आहे. या ऑनस्क्रीन मायलेकींनी मिळून हा इन्स्टा ट्रेण्ड फॉलो केला आहे.
दरम्यान, रेश्माने गेल्यावर्षी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रेश्माने पवनशी लग्न केलं. रेश्माचा पती हा साऊथ इंडियन आहे.