Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आता आमच्यासाठी काम राहिलं नाही" अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, 'नव्या कलाकारांमुळे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 11:40 IST

सिनेमांमध्ये काम करताना मिळालं टीव्ही अभिनेत्रीचं लेबल, आशा नेगीने केले अनेक खुलासे

'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आशा नेगी (Asha Negi) तिच्या सौंदर्य आणि साधेपणामुळे चाहत्यांचं मन जिंकते. आशा नेगी टेलिव्हिजनवरील अतिशय प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे लाखो चाहतेही आहेत. मात्र आता अभिनेत्रीला काम मिळत नसल्याचं दु:ख तिने व्यक्त केलं आहे. आशाने मालिकांसोबतच वेबसीरीजमध्येही काम केलं आहे. तरी ती आता कामाच्या शोधात आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आशा म्हणाली, "मी सिनेमांमध्ये काम करण्याच्या विचारात होते. मात्र त्यांनी माझ्यावर टीव्ही अभिनेत्रीचं लेबलच लावून टाकलं जे फार वाईट होतं. वेब शोजमध्येही काही खास नव्हतं. पण आता ज्या सीरिजमध्ये मी काम करत आहे ती मला खूप मेहनत करुन मिळाली आहे. मी बऱ्याच रिजेक्शन्सला सामोरी गेले. मात्र चांगली स्क्रीप्ट मिळताच मी काम सुरु केलं. इथे नवीन लोक भेटले त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली."

स्ट्रगलचे दिवस आठवताना आशा म्हणाली, "मी त्या काळात बरंच काही शिकले. अनुभव घेतला. त्यामुळे मला त्याचं दु:ख नाही. पण याचं नक्कीच वाईट वाटतं की आता आमच्यासाठी टीव्हीवर काहीच काम नाही. नवीन कलाकार आल्यानंतर जुन्या कलाकारांचा विसर पडला आहे. म्हणून मी वेबसीरीजकडे वळले आहे."

आशा नेगीने 'पवित्र रिश्ता','एक मुठ्ठी आसमान','कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ','ख्वाबो के परिंदे'सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिची शर्मन जोशीसोबतची 'बारिश' ही सीरिज खूप लोकप्रिय झाली होती. सध्या आशा नवीन वेब शोजमध्ये काम करत आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारवेबसीरिजटेलिव्हिजन