Join us

'देवो के देव महादेव' फेम मोहित रैनाच्या घरी चिमुकलीचं आगमन, शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:25 IST

मोहितने लेकीची झलक दाखवत खास फोटोही शेअर केला आहे.

'देवो के देव महादेव' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) नुकतीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक गुड न्युज दिली आहे. मोहितच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. पत्नी आदिती शर्माने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मोहितने लेकीची झलक दाखवत खास फोटोही शेअर केला आहे.

काही वेळापूर्वीच मोहितने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला.मोहित, पत्नी आदिती आणि सोबत बाळाचा इवलासा हात असलेला हा फोटो आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले, ' अशा प्रकारे आता आम्ही दोघाचे तीन झालो आहोत. बेबी गर्लचे स्वागत!!'

मोहितने पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी शुभेच्छांवर वर्षाव करत आहेत.

गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी मोहित आणि आदिती लग्नबंधनात अडकले होते. त्याचं लग्नही चाहत्यांसाठी एक सरप्राईजच होतं. लग्नानंतर एका दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. काही दिवसांपूर्वी मोहित आणि आदितीच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.दोघंही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करत नव्हते म्हणून या अफवांना सुरुवात झाली होती. आदिती या क्षेत्रातली नाही त्यामुळे उगीच तिचे लक्ष इकडे लागू नये म्हणून आम्ही फॉलो करत नाही असं कारण त्याने दिलं होतं. आता दोघांनी दिलेल्या या आनंदाच्या बातमीने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्