Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tunisha Sharma : श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे डिस्टर्ब झालो अन्...शिझान खानचा पोलिसांसमोर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:23 IST

आईच्या तक्रारीवरुन शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. २८ डिसेंबरपर्यंत शीझान खान पोलिस कोठडीत असणार आहे.

Tunisha Sharma : टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणामुळे टेलिव्हिजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईनं तुनिषाचा सहकलाकार आणि तिचा बॉयफ्रेंड शिझान खान याच्यावर धक्कादायक आरोप केले.आईच्या तक्रारीवरुन शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. २८ डिसेंबरपर्यंत शीझान खान पोलिस कोठडीत असणार आहे. चौकशीदरम्यान शिझान खानने एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे.

शिझानने सांगितले ब्रेकअपचे कारण 

आफताब पुनावालाने गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरचे ३२ तुकडे करुन जंगलात फेकले होते ही घटना ताजी आहेच. हीच घटना ऐकून मी विचलित झालो आणि म्हणूनच तुनिषासोबत ब्रेकअप केला असा दावा शिझानने केला आहे. आफताब आणि श्रद्धाच्या प्रकरणामुळे देश हादरला होता. डिस्टर्ब होऊन मी तुनिषासह नातं तोडण्याचा निर्णय घेतला. 

३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ? त्या १५ मिनिटात नेमके काय घडले

पोलिस कोठडीतील पहिल्या दिवशी शिझानने पोलिसांना दोघांच्यात नेमके काय झाले होते याचा खुलासा केला. श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचे जे परिणाम दिसत आहेत हे फार डिस्टर्ब करणारे आहे. तसेच तुनिषाने याआधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा शिझानने केला आहे.  तो म्हणाला, ' काही दिवसांपूर्वीच तुनिषाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी तिला वाचवले आणि तिच्या आईला तिची काळजी घेण्यास सांगितले होते. ट

टॅग्स :तुनिशा शर्मामुंबईगुन्हेगारीटेलिव्हिजन