Join us

तृप्ती-विकी कौशलचं हॉट आणि बोल्ड 'जानम' गाणं पाहून लोकांनी घेतली कतरिना कैफची फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 09:05 IST

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या 'जानम' गाण्याने प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवलीय (janam, vicky kaushal, tripti dimri)

विकी कौशल - तृप्ती डिमरी यांच्या आगामी 'बॅड न्यूज' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'बॅड न्यूज' सिनेमात अॅनिमल मधली भाभी २ म्हणजेच अभिनेत्री तृप्ती डिमरी झळकणार आहे. 'बॅड न्यूज' हा कॉमेडी सिनेमा असून सिनेमात विकी कौशल, अॅमी वर्क हे दोघांची कॉमेडी जुगलबंदी पाहायला मिळते. 'बॅड न्यूज' सिनेमातल्या नव्या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ केलाय. हे गाणं म्हणजे जानम. या गाण्यात विकी-तृप्तीची हॉट केमिस्ट्री बघायला मिळतेय. 

जानम गाण्यात तृप्ती- विकीच्या बोल्डनेसचा तडका

'बॅड न्यूज' सिनेमातील जानम गाण्यात विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांनी अतिशय इंटिमेट सीन्स केले आहेत. बिकिनीतील तृप्ती कधी स्विमिंग पूलमध्ये, कधी बेडवर तर कधी डायनिंग टेबलवर तिच्या सौंदर्याच बहरलेली दिसते. या गाण्यात तृप्ती डिमरी अन् विकीचे बोल्ड सीन्स पाहायला मिळतात. विकीची हॉट स्टाईल पाहून लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

विकी-तृप्तीच्या या नव्या गाण्याला अल्पावधीत मिलियन्सच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं पाहून लोकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. 'कतरिना हे गाणं पाहून म्हणेल तौबा-तौबा'. 'विकी रॉक कतरिना शॉक', 'कतरिनाच्या मनःशांतीसाठी दोन मिनिटं शांतता', अशा कमेंट करत लोकांनी विकीची चांगलीच शाळा घेतलीय.

या तारखेला रिलीज होणार 'बॅड न्यूज'

कॉमेडी आणि रोमान्सने भरलेला 'बॅड न्यूज' हा सिनेमा आनंद तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे. करण जोहर या सिनेमाचा निर्माता आहे. १९ जुलै २०२४ रोजी 'बॅड न्यूज' थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विकी, तृप्तीसोबतच अ‍ॅमी आणि नेहा धुपिया देखील अभिनय करताना दिसणार आहे. करीना कपूर आणि अक्षय कुमार यांचा २०१९ साली प्रदर्शित झालेला 'गुड न्यूज' या सिनेमाप्रमाणेच 'बॅड न्यूज' सिनेमाची कथाही हटके असणार यात शंका नाही.

टॅग्स :विकी कौशलतृप्ती डिमरीबॉलिवूडकतरिना कैफ