Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 15:53 IST

गेल्या अनेक दिवसांपासून JNU सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. अखेर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (JNU)

बॉलिवूडमध्ये सध्या वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या 'मुंज्या' आणि 'चंदू चँपियन' हे दोन्ही वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांचं लक्ष वेधून आहेत. अशातच राजकीय परिस्थितीवर ज्वलंतपणे भाष्य करणारा JNU सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. ट्रेलरमध्ये असणारी काही वाक्य ही सध्याच्या राजकारणावर टोकदार भाष्य करणारी आहेत. ट्रेलरमध्ये मराठमोळ्या सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळतोय. 

JNU सिनेमाचा रोखठोक ट्रेलर

JNU सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं की, JNU विद्यापीठात गटबाजीचं राजकारण सुरु असलेलं दिसतं. विद्यार्थ्यांमध्ये जातीवरुन गट पडलेले दिसतात. सिनियर विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचं काम करताना दिसतात. पुढे स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यापीठात अनुचित प्रकार बघायला मिळतात. विद्यापाठीतलं वातावरण नंतर तापलेलं पाहायला मिळतं आणि हिंसाचारही पाहायला मिळतो. ट्रेलरमध्ये असलेली वाक्य टोकदार आणि रोखठोक आहेत. JNU च्या ट्रेलरमध्ये गंभीर विषय ज्वलंतपणे मांडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. 

JNU मधले कलाकार

JNU सिनेमात सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय उर्वशी रौटेला, पियुष मिश्रा, रवी किशन, विजय राज, रश्मी देसाई, सोनाली सेवगल, अतुल पांडे आणि कुंज आनंद हे कलाकार सिनेमात झळकणार आहेत. विनय वर्मा यांनी JNU सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. प्रतिमा दत्ता सिनेमाच्या निर्मात्या आहेत. २४ जूनला सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होतोय. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :रवी किशनविजय राजउर्वशी रौतेलाजेएनयूजेएनयू