'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेली अनेक वर्ष टीव्ही इंडस्ट्रीत TRP च्या शर्यतीत अव्वल आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल मात्र गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. या मालिकेतील अनेक कलाकारांनी अपमानास्पद आणि असभ्य वर्तणवणूक दिल्यामुळे मालिकेच्या टीमवर आरोप केले होते. अशातच मालिकेतील एका मराठी अभिनेत्रीला असाच विचित्र अनुभव आल्याने तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर
एका मराठी मुलीला दुखावलं...'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सुनिताची भूमिका मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता शिसोडे साकारत होती. पण प्राजक्ताने मालिका सोडली आहे. याविषयी प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ''तारक मेहता मालिकेच्या टीमकडून मला सोशल मीडिया पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव टाकला जातोय. याशिवाय मी पोस्ट डिलीट केली की नाही यासाठी ते माझं सोशल मीडिया अकाऊंट तपासत आहेत.''
Web Summary : Prajakta Shisode left 'Taarak Mehta' after facing pressure to delete social media posts. She alleges mistreatment, advising Marathi actresses against similar roles, claiming they are insignificant. She felt demeaned and unsupported.
Web Summary : सोशल मीडिया पोस्ट हटाने के दबाव के बाद प्राजक्ता शिसोदे ने 'तारक मेहता' छोड़ दिया। उन्होंने दुर्व्यवहार का आरोप लगाया, मराठी अभिनेत्रियों को ऐसी भूमिकाओं के खिलाफ सलाह दी, और कहा कि वे महत्वहीन हैं। वह अपमानित महसूस कर रही थीं।