Join us

'वेळच आहे सर्वकाही..!', रिंकू राजगुरूच्या फोटोसोबत कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 17:33 IST

अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि त्याला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे.

सैराट चित्रपटात आर्चीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे. मात्र यावेळेला तिने तिच्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. रिंकूच्या या फोटोला आणि कॅप्शनला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

रिंकू राजगुरू सोशल मीडिया इंस्टाग्रामवर खूप एक्टिव्ह आहे आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने स्काय ब्लू रंगाचा स्लीवलेस टॉप घातला आहे आणि मनगटातील घडाळ्यात ती वेळ पाहताना दिसते आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, वेळच सर्वकाही आहे. रिंकू राजगुरूच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

सैराट हा रिंकू राजगुरूचा पहिला चित्रपट आहे आणि या चित्रपटानंतर तिच्यातही खूप बदल झालेला पहायला मिळतो आहे. दिवसेंदिवस रिंकू ग्लॅमरस होत चालली आहे. त्यासाठी ती खूप मेहनतही घेताना दिसते. ती दररोज न चुकता वर्कआउट करते. 

रिंकू राजगुरूच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती मराठी चित्रपट छूमंतर आणि हिंदी चित्रपट झुंड आणि हिंदी वेबसीरिज जस्टिस डिलिव्हर्डमध्ये झळकणार आहे.

छूमंतर चित्रपटात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर हिंदी चित्रपट झुंडमध्ये ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. जस्टिस डिलिवर्ड या वेबसीरिजमध्ये रिंकू अमोल पालेकर यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2प्रार्थना बेहरेऋषी सक्सेनासुव्रत जोशीअमिताभ बच्चनअमोल पालेकर