Tiger Shroff Recovers From Dengue: आजारपणानंतर कोणाचीही प्रकृती खराब होऊ शकते. मग तो सामान्य माणूस असो की सुपरस्टार. विशेषत: डेंग्यू, मलेरियासारखे गंभीर आजार असतील तर त्याचे परिणामही चेहऱ्यावर दिसू लागतात. असंच काहीस घडलं आहे फिटनेस फ्रिक अभिनेता टायगर श्रॉफसोबत.डेंग्यू या आजारातून बरे झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, जो काही वेळातच व्हायरल झाला.
टायगर श्रॉफला डेंग्यू झाला म्हटल्यावर त्याचे चाहते चिंतेत होते. आता त्याच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हा फोटो मी डेंग्यूतून बरे झाल्यावर एका दिवसानंतर काढला होता'. या फोटोत नेहमीच फिटनेस आणि आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या टायगरचा सुकलेला चेहरा पाहून चाहते त्याच्या तब्येतीबद्दल चिंतेत पडले आहेत. पण चांगली गोष्ट म्हणजे, हा गंभीर आजार असूनही त्याचे ॲब्स अजूनही शाबूत आहे.
टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'बागी ४' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगरशिवाय संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अलिकडेच टायगर हा 'सिंघम अगेन' मध्ये झळकला होता. ज्यामध्ये त्याची सहायक भूमिका होती. याआधी त्यांचा 'बड़े मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट आला होता आणि तो चित्रपट फ्लॉप ठरला होता.