Join us
Daily Top 2Weekly Top 5

1981 सालच्या गाजलेल्या नाटकातील आहे हा फोटो; तुम्ही ओळखू शकता का या अभिनेत्रींना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 18:40 IST

Marathi actress: या दोन्ही अभिनेत्री आजही मराठी कलाविश्वात सक्रीय असून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.

कलाविश्वात असे असंख्य कलाकार आहेत ज्यांनी फार कमी वयात त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. यात काही कलाकारांनी रंगमंचापासून त्यांच्या अभिनयाला सुरुवात केली. त्यामुळे नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तीनही माध्यमांमध्ये या कलाकारांनी त्यांचं भक्कम स्थान निर्माण केलं. सध्या सोशल मीडियावर दोन लोकप्रिय अभिनेत्रींचा फोटो व्हायरल होत आहे. या दोन्ही अभिनेत्रींचं नाव आज मराठी कलाविश्वात मोठ्या आदराने घेतलं जातं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये  मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्री आहेत. हा फोटो १९८१ सालचा असून एका गाजलेल्या नाटकातील आहे. हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी अनेक तर्कवितर्क लावून या अभिनेत्रींना ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. यात काहींनी त्यांना अचूक ओळखलं तर काहींना मात्र अपयश आलं.

हेमंत ढोमेच्या सासूबाईंनी केला 'जमाल कुडू'वर जबरदस्त डान्स; उज्वला जोग यांचा ट्रेंडिंग व्हिडीओ व्हायरल

हा फोटो मित्राची गोष्ट या १९८१ साली गाजलेल्या नाटकातील आहे. या फोटोमध्ये दिसणाऱ्या दोन दिग्गज अभिनेत्री म्हणजे उज्ज्वला जोग आणि रोहिणी हट्टंगडी . सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या उज्ज्वला जोग यांनी हा फोटो शेअर करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दरम्यान, 'वर्ष 1981 नाटक 'मित्राची गोष्ट 'असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. उज्ज्वला जोग आणि रोहिणी हट्टंगडी या दोघींनीही आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तर, उज्ज्वला  या मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम करताना दिसून येतात.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजननाटकसिनेमामराठी