Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आता पूर्णविराम देतोय..."; 'दृश्यम' सिनेमाच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का, दिग्दर्शकाने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 08:24 IST

'दृश्यम' चित्रपटाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 'दृश्यम ३' हा या मालिकेतील शेवटचा चित्रपट असेल आणि यानंतर कोणताही सिक्वेल येणार नाही, असा मोठा खुलासा करण्यात आला आहे.

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा गाजलेला चित्रपट 'दृश्यम'च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 'दृश्यम ३' हा या मालिकेतील शेवटचा चित्रपट असेल आणि यानंतर कोणताही सिक्वल येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एका मुलाखती दरम्यान बोलताना जीतू जोसेफ म्हणाले की, "मी कधीही या फ्रेंचायझीचा चौथा भाग बनवण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. लोक मला हे सर्व कुठेतरी थांबवण्यास सांगत आहेत, म्हणूनच मी आता याला पूर्णविराम देत आहे. 'दृश्यम ३' नंतर पुढे कोणताही भाग येणार नाही." स्वतः दिग्दर्शक असं बोलल्याने 'दृश्यम'च्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रदर्शनाची तारीख

बहुप्रतिक्षित 'दृश्यम ३' हा चित्रपट एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शकांनी चाहत्यांना एक विशेष विनंती केली आहे की, त्यांनी कोणत्याही मोठ्या अपेक्षांचे ओझे घेऊन चित्रपट पाहू नये. "कोणत्याही दबावाशिवाय चित्रपटाचा आनंद घ्या, तरच तुम्हाला त्याचा खरा अनुभव मिळेल," असे त्यांनी म्हटले आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल.

विशेष म्हणजे, मोहनलाल यांचा मल्याळम 'दृश्यम ३' एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे, तर अजय देवगणचा हिंदी रिमेक 'दृश्यम ३' ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये साधारण ६ महिन्यांचे अंतर असेल. या भागाची कथा जिथे दुसरा भाग संपला होता, तिथूनच पुढे सुरू होणार आहे. 'दृश्यम' आणि 'दृश्यम २' ने बॉक्स ऑफिसवर अफाट यश मिळवले होते. आता या यशस्वी फ्रेंचायझीचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरा उतरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Drishyam 3 Finale: Director Announces End of the Franchise

Web Summary : Director Jeethu Joseph confirms 'Drishyam 3' will be the series' last film. Mohanlal's Malayalam version releases April 2026, Ajay Devgn's Hindi remake follows in October. Story continues where part two ended.
टॅग्स :दृश्यम 2बॉलिवूडटेलिव्हिजनअजय देवगणतब्बू