Join us

अर्जुन रामपालचे टॉलिवूडमध्ये पदार्पण; 'भगवंत केसरी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 20:46 IST

अर्जुन रामपाल 'भगवंत केसरी' या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

बॉलिवूडचा मोस्ट चार्मिंग अभिनेता अर्जुन रामपालच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  अर्जुन रामपालचा बहुप्रतिक्षित 'भगवंत केसरी' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अर्जुन रामपाल या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. वारंगलमध्ये ट्रेलर रिलीजसाठी भव्य सोहळा आयोजित केला होता. 

ट्रेलर  पाहिल्यानंतर चाहते आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भगवंत केसरी हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल रविपुडी यांनी केले आहे. या चित्रपटात बालकृष्ण , काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत असून श्रीलीला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

 अर्जुन रामपाल हा चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तो दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये आहे आणि त्याचे खूप चाहते आहेत. त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर अर्जुनने 1998 मध्ये सुपरमॉडेल मेहर जेसियाशी लग्न केलं होतं. दोघांना महिका आणि मायरा या दोन मुली आहेत. पण, 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अर्जुन दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएलासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. गॅब्रिएला अर्जुनपेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. 

टॅग्स :अर्जुन रामपालTollywoodसिनेमा