Join us
Daily Top 2Weekly Top 5

४० कोटींची कमाई तरी एका रात्रीत कंपनी गायब; खडतर कहाणी ऐकून 'शार्क टँक'चे जजही भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 17:38 IST

अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'शार्क टँक इंडिया २' च्या आगामी भागाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे.

नवी दिल्ली: शार्क टँक इंडिया २ ची सुरुवात अतिशय चांगल्या स्वरुपात झाल्याचे दिसून येत आहे. हा बिझनेस रिअॅलिटी शो टेलिव्हिजनवर येताच प्रकाशझोतात आला आहे. सध्या शार्क टँक इंडिया २ या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका उद्योजक समूहाने करोडोंच्या नुकसानीची अशी कहाणी सांगितली की, ज्याने शार्कच्याही डोळ्यात पाणी आले.

जिथे ऑइलची पाइपलाइन तिकडे तो भाड्याने घ्यायचा पत्र्याचा शेड; ४०० कोटी कमावले, शेवटी बिंग फुटलं!

उद्योजकाची गोष्ट ऐकून शार्क्स देखील धक्का बसला. सोनी टीव्हीने अलीकडेच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'शार्क टँक इंडिया २' च्या आगामी भागाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या एका उद्योजक गटाने त्यांची कंपनी रातोरात उध्वस्त झाल्याची कहाणी सांगितली, जी ऐकल्यानंतर सर्व शार्कही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतात; वर्षभर एकच फळ विकतात, डायरेक्ट करोडपती बनतात

सदर उद्योजकाने सांगितले की, २०१४ मध्ये त्यांनी एक कंटेन्ट कंपनी सुरू केली. त्यांच्या कंपनीचा वार्षिक महसूल ४० कोटी होता, पण एका संध्याकाळी आम्ही मीटिंगसाठी गेलो आणि सकाळी उठलो तेव्हा संपूर्ण कंपनी गायब झाली होती, असं सदर उद्योजकाने सांगितले.

आपल्या व्यवसायाचे हे मोठे नुकसान सांगताना उद्योजकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. बोट कंपनीचे संस्थापक आणि शुगर कॉस्मेटिक्सचे सीईओ त्यांची वेदनादायक कहाणी ऐकून पूर्णपणे हादरले. मात्र, या तिन्ही उद्योजकांना त्यांची कंपनी 'स्टेज' पुन्हा त्या पातळीवर आणण्यासाठी किती शार्क्समधून किती निधी मिळतो आणि ते किती इक्विटी शेअर करतील, हे येत्या एपिसोड्समध्ये कळेल पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनइन्स्टाग्राम