Join us

'आई कुठे काय करते' मध्ये आशुतोषचं निधन, प्रेक्षक संतापून म्हणाले; 'चांगल्या मालिकेची वाट...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 19:04 IST

'आई कुठे काय करते'चा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Kartein) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. टीआरपीच्या यादीत ही मालिका कायम पहिल्या स्थानावर असायची. हिंदीतील 'अनुपमा' मालिकेच्या आधारे या मालिकेची कथा घेण्यात आली होती. तरी मराठी प्रेक्षकांनी मालिकेला खूप प्रतिसाद दिला. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, यश, आशुतोष अशी प्रत्येक पात्र गाजली. आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे आणि प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसून येतीये. सध्या मालिका कंटाळवाणी होत असून लवकर बंद करा अशीच मागणी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमधून केली जात आहे. दरम्यान मालिकेत आलेला ट्विस्ट चीड आणणाराच आहे. काय आहे तो ट्विस्ट?

'आई कुठे काय करते'चा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये आशुतोषचं चक्क निधन झालं आहे. आशुतोषच्या निधनाने साहजिकच अरुंधती कोलमडली आहे. दरम्यान आशुतोषची आई  त्याच्या निधनाला अरुंधतीलाच जबाबदार धरते. यामुळे अरुंधतीला धक्काच बसतो. तेवढ्यात अरुंधतीची आधीची सासू कांचन जिचं अरुंधतीशी कधीच पटलेलं नसतं ती अरुंधतीच्या पाठीमागे उभी राहते. ती तिला घरी घेऊन जायला येते. त्यामुळे आता अरुंधती पुन्हा अनिरुद्धच्या आयुष्यात परत जाणार का असंच चित्र दिसतंय. 

मालिकेत आलेल्या या ट्विस्टवर आता प्रेक्षकांचा संताप झाला आहे. 'मालिका बंद केली तर बरं होईल', 'काय लावलं आहे लोक बघतात म्हणून काहीही दाखवणार का? थोडं इंटरेस्टिंग दाखवत आहेत म्हणून पुन्हा बघायला लागलो तर पुन्हा असलं दाखवताय.' अशा कमेंट्स आल्या आहेत. 

'आई कुठे काय करते' मालिका आधी प्राईम टाईमला म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता लागायची. टीआरपीत मालिका घसरल्याने वेळ दुपारी २.३० करण्यात आली आहे. 18 मार्चपासून मालिका नवीन वेळेत प्रसारित होईल. या वेळेच्या आधीच असा ट्विस्ट मालिकेत आणण्यात आला आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामधुराणी प्रभुलकरसोशल मीडियाट्रोलटेलिव्हिजन