Rani Mukerji Birthday Special : एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी आणि लग्नानंतर आजही बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेली अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. राणी प्रोफेशनल लाईफइतकीच तिच्या पर्सनल लाईफचीही झाली. एकेकाळी अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) व राणीचं अफेअर प्रचंड गाजलं होतं. कधीकाळी अभिषेक व राणी रिलेशनशिपमध्ये होते. करिश्मा कपूरसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात राणीची एन्ट्री झाली होती.बंटी और बबली, युवा, कभी अलविदा ना कहना यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम करता करता अभिषेक व राणी एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं.
या ब्रेकअपनंतर राणी व बच्चन कुटुंबातील संबंध इतके खराब झाले होते की अभिषेक व ऐश्वर्याच्या लग्नातही राणीला बोलवलं गेलं नव्हतं. यावर राणीने नाराजीही बोलून दाखवली होती. मी अभिषेकला मित्र समजायचे. पण तो फक्त को-स्टार निघाला, अशी ती म्हणाली होती.राणीशी ब्रेकअपनंतर अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं. तर, राणीनेही यशराज फिल्म्सचा मालक आदित्य चोप्राशी लगीनगाठ बांधली. ऐश्वर्या-अभिषेकला आराध्या नावाची मुलगी आहे, तर आदित्य-राणीला आदिरा नावाची मुलगी आहे.