Join us

विकी कौशलला लहानपणी होती 'ही' विचित्र सवय, सनी कौशलने केला मजेदार खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 14:06 IST

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये विकी कौशल आणि सनी कौशल सहभागी झाले.

'द कपिल शर्मा' शोचा कायम चाहत्यांमध्ये बोलबाला असतो. काही दिवसांपूर्वी 'द कपिल शर्मा' ऑफएअर गेला होता. पण मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा  'द ग्रेट इंडियन कपिल शो'चाहत्यांच्या भेटीसाठी आला आहे. सध्या सर्वत्र कपिल शर्मा आणि त्याच्या आगामी शोची चर्चा रंगली आहे. कपिलचा हा शो जगभरात लोकप्रिय होत आहे. आत्तापर्यंत या शोचे 3 एपिसोड आले आहेत.  आता चौथ्या एपिसोडमध्ये कौशल ब्रदर्सने धमाल उडवली आहे. या एपिसोडमध्ये दोन्ही भावांनी अनेक रंजक गोष्टींचा खुलासा केला आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये विकी कौशल आणि सनी कौशल सहभागी झाले. यावेळी सनी कौशलने आपला मोठा भाऊ विकीच्या लहानपणीच्या विचित्र सवयीचा खुलासा केला. सनी म्हणाला, 'विकीला लहानपणापासून एक विचित्र सवय होती.  प्रत्येकाला झोपेत बोलायची सवय असते, पण विकीला झोपेत बोलायची सवय तर होतीच. पण, तो नुसता बोलायचा नाही, तर तसं वागायचाही. त्यामुळे कधी-कधी तो झोपला आहे की जागा आहे, हेच मला कळायचं नाही'.

 असाच एक किस्सा सनीनं सांगितला. तो म्हणाला,  'विकी आणि मी एकाच खोलीमध्ये झोपायचो. एक दिवस मी झोपणार होतो, तेवढ्यात विकी उठला आणि मला पेपर तपासण्यास सांगु लागला. मला कळून चुकलं की हा झोपेत आहे. मी त्याला म्हटलं तु खूप चांगला पेपर लिहला आहेस, तुला 100 पैकी 100 मार्क मिळाले आहेत. आता झोपी जा'. सनीनं हा किस्सा सांगताच एकच हशा पिकला. कौशल भावंडं असलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा हा नवीन भाग तुम्हाला शनिवारी नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.

टॅग्स :विकी कौशलसनी कौशलबॉलिवूडसेलिब्रिटी