Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुझी जात कोणती?' नेटकऱ्याच्या प्रश्नाला अभिनेत्री जुई गडकरीने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 11:49 IST

उत्तम अभिनयशैली आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.

पुढचं पाऊल' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी (jui gadkari). उत्तम अभिनयशैली आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. कर्जतच्या या लेकीने कलाविश्वात तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच तिला तिची जात विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला जुईने उत्तर देत एका वाक्यात तोंड बंद केलं आहे.

अलिकडेच जुईने इन्स्टाग्रामवर 'Ask me a  Question' हे सेशन ठेवलं होतं. यावेळी तिनं 'खूप दिवस गप्पा मारल्या नाहीत' असं म्हणत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला 'ताई, तुझी जात कोणती आहे?' असा प्रश्न केला. यावेळी तिनं या प्रश्नाला दिलेल्या  उत्तराने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतलं. तिनं 'मी भारतीय आहे' असं उत्तर चाहत्याच्या प्रश्नाला दिलं. 

यासोबतच एका चाहत्याने तिला 'सायली आणि जुईमध्ये काय फरक आहे?' असा प्रश्न केला.  यावर उत्तर देत जुई म्हणाली, 'माझ्या सायलीएवढी सहनशक्ती नाही. मी एक-दोन वेळा सांगून बघते. त्यानंतर त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातून मी कट करते. नो भांडण नो राग. बाकी मी तिच्यासारखीच आहे'. तर एकाने विचारलं की, जुई गडकरी नाटकात काम करायला इच्छुक आहे का? या चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, 'नक्कीच. मी एका चांगल्या संधीची प्रतीक्षा करत आहे'.

जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. जुईने याआधी तिने "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजविण सख्या रे…' आणि 'पुढचं पाऊल यात झळकली आहे.  शिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. 

टॅग्स :जुई गडकरीसेलिब्रिटीमराठी अभिनेताटेलिव्हिजन