Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तो क्षण आलाच! प्रतिमाला घरी घेऊन येणार सायली, 'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:07 IST

'ठरलं तर मग'मध्ये अर्जुन-सायलीमधील प्रेम फुलत असताना, त्यांच्या नात्यात गोडवा येत असतानाच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण मालिकेत दाखवला जाणार आहे. 

'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना आवडते. मालिकेतील पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करतात. 'ठरलं तर मग'मध्ये अर्जुन-सायलीमधील प्रेम फुलत असताना, त्यांच्या नात्यात गोडवा येत असतानाच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण मालिकेत दाखवला जाणार आहे. 

मालिकेत पूर्णा आजी लेक प्रतिमाच्या आठवणीत भावुक झाल्याचं सुरुवातीपासूनच पाहायला मिळत आहे. पू्र्णा आजीबरोबरच प्रतिमा सुभेदारांच्या घरी कधी परतणार, याची प्रेक्षकही वाट पाहत होते. अखेर तो क्षण आला आहे. आता सायली प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या बंगल्यात प्रवेश करणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सायली प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. प्रतिमाला पाहून पूर्णा आजीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. तर सुभेदार कुटुंबीयही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

अखेर मालिकेत मायलेकींची भेट होणार असल्यामुळे प्रेक्षकही आनंदी आहेत. ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'ठरलं तर मग' मालिकेचा हा भाग २६ जुलैला प्रसारित केला जाणार आहे. या मालिकेत अभिनेत्री शिल्पा नवलकर प्रतिमाच्या भूमिकेत आहेत. 

सायली जरी प्रतिमाला घेऊन घरी येत असली तरी अद्याप प्रतिमाच आपली आई असल्याचं तिला माहीत नाहीये. त्यामुळे पुढे आणखी रंजक वळण घेताना मालिका बघायला मिळणार आहे. आता आणखी कोणते ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळतात. यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारजुई गडकरीस्टार प्रवाह