Join us
Daily Top 2Weekly Top 5

Appi Amchi Collector...! सुरू होतेय नवी मराठी मालिका, त्याआधी पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 11:45 IST

Appi Amchi Collector Promo: एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

मराठी मालिकांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग वाढतोय. साहजिकच, वेगवेगळ्या विषयावरच्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सध्या सोशल मीडियावर या नव्या मालिकेची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. या मालिकेचं नाव आहे, ‘अप्पी आमची कलेक्टर’(Appi Amchi Collector) . झी मराठी (Zee Marathi) या वाहिनीवर येत्या 22 ऑगस्टपासून संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे.मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पहायला मिळतोय. 

श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांच्या वज्र प्रॉडक्शन निर्मित असलेल्या या मालिकेत एक नवा विषय, एक नवी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  प्रोमोमध्ये दिसत आहे की, अपर्णा सुरेश माने नावाची मुलगी लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कलेक्टर झाली आहे. कॉन्ट्रक्टरच्या कामाऐवजी ती आधी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्याला महत्त्व देते. प्रोमोमधील तिच्या तोंडचे संवाद लक्ष वेधून घेतात.   अभिनेत्री शिवानी नाईक या मालिकेत अप्पीची अर्थात अपर्णाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

प्रोमो पाहून चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. ‘काहीतरी नवीन सबजेक्टवर सीरिअल येत आहे म्हणायचं. नाही तर त्याच त्या लव्हस्टोरी आणि हाऊस वाईफचे अपमान रडगाणं सगळीकडे सुरू आहे. आशा आहे ही सीरिअल वेगळी असेल,’अशी कमेंट एका चाहत्याने दिली आहे. ‘सध्या प्रेरणादायी मालिकांची गरज आहे, गुड वर्क,’ अशी प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने दिली आहे.

टॅग्स :झी मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार